माळावर फुलेलेल्या  झेंडूवर फिरवला नांगर 

download.jpg
download.jpg
Updated on

आटपाडी (सांगली) टेंभूच्या पाण्याच्या कृपेने अल्पावधीत झेंडू फुलांचे हब बनलेल्या हिवतडच्या माळावर फुललेला झेंडू कोरोणाच्या साथीमुळे कोमेजून गेला आहे. बाजारपेठच बंद असल्याने शेतकऱ्यांनी झेंडूवर नांगर चालवला आहे. झेंडू पासून दरवर्षी मिळणारे सात ते नऊ कोटीचा फटका बसला आहे. 
टेंभू योजनेचा मुख्य कालवा गावच्या माथ्यावरुन जातो. या पाण्याचा सर्वाधिक लाभ हिवतडला झाला आहे. पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी विविध पिके घेतली. यात झेंडूचे चांगले उत्पन्न मिळण्याचा हातखंडा अनेकांनी मिळवला. आणि सारे गाव झेंडूच्या मागे लागले. नंतर काळेवाडी, गोमेवाडी, करगणी, मानेवाडी, नेलकरंजी या भागातही झेंडूची लागवड होत गेली. 25 जानेवारी ते 25 एप्रिल दरम्यान बहुतांश शेतकरी झेंडूची मशागत करून ,खते घालून बेडवर लागवड करतात. हिवतड मध्ये चारशे एकर तर परिसरातील सर्व गावासह सहाशे एकर क्षेत्रावर झेंडू लावला जातो.

झेंडूची फुले मुंबईत दादरला मीनाताई ठाकरे फुल मार्केटला दररोज दोन ते चार आयशर गाड्या पेट्या भरून पाठवल्या जातात. संपूर्ण हंगामात झेंडूला सरासरी 60 ते 100 रुपया दरम्यान किलोला दर मिळतो. यासाठी एकरी साठ हजार रुपया दरम्यान खर्च येतो. खर्च वजा जाता एक ते दीड लाख रुपये पदरात पडतात. संपूर्ण हंगामात झेंडू पासून सात ते नऊ कोटी रुपये दरवर्षी तालुक्‍यात येतात.

दरवर्षीप्रमाणे यंदाही झेंडूची लागवड केली.हिवतडचे माळरान फुलाने फुलले पण कोरोना साथीमुळे बाजारपेठा बंद. याचा मोठा फटका झेंडूला बसला. एकही फुल विक्रीसाठी गेले नाही. पहिल्या टप्प्यात लागवड केलेल्या झेंडूवर शेतकऱ्यांनी अक्षरशा नांगर फिरवला आहे. दुसऱ्या टप्प्यात लागवड केलेल्या झेंडूची कळी तोडली जात आहे. तिसऱ्या टप्प्यातील लागवड अपवाद वगळता ठप्प झाली आहे. एप्रिल पासून विवाह सोहळ्याची सुरुवात होते.यासह विविध कार्यक्रमाला झेंडूची मोठी मागणी असते मात्र कोरोणामुळे सोहळे आणि उत्सव बंद झाले.त्यामुळे झेंडूची मागणी बंद झाली आहे. 

दोन एकर झेंडू लावला पण कोरोणामुळे मार्केट बंद पडले. त्यामुळे कसलाही झेंडू पाठवला नाही. शेवटी झेंडूचे शेत नांगरले. झेंडू पासून गावाला मिळणारे सात ते नऊ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

प्रमोद धायगुडे (शेतकरी हिवतड). 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com